श्रीपाद छिंदम पुन्हा आठ दिवस हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुन्हा आठ दिवस जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या प्रकरणी छिंदम याला 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले होते. केडगाव प्रकरणानंतर तोफखाना पोलिसांनी पुन्हा त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल केला होता. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी छिंदमला पुन्हा आठ दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.
Web Title: shripad chindam tadipar crime