कोल्हापूरात मराठा क्रांती मूक मोर्चाला पाठिंबा ४३ समाजांचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - शहरात १५ ऑक्‍टोबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात ताकदीने सहभागी होण्याचा निर्धार जिल्हा, शहरातील विविध ४३ समाज संघटनांनी केला. तसेच दुकाने, व्यवसाय बंद ठेवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही या वेळी सर्वांनी दिली. मुस्लिम बोर्डिंगमध्ये आज बारा बलुतेदार समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

कोल्हापूर - शहरात १५ ऑक्‍टोबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात ताकदीने सहभागी होण्याचा निर्धार जिल्हा, शहरातील विविध ४३ समाज संघटनांनी केला. तसेच दुकाने, व्यवसाय बंद ठेवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही या वेळी सर्वांनी दिली. मुस्लिम बोर्डिंगमध्ये आज बारा बलुतेदार समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी नियोजन केले. मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, अधीक्षक कादर मलबारी, आदील फरास, हसन देसाई, पापाभाई बागवान, ख्वाजुद्दीन खाटिक, अस्लम मोमीन, साजीद खान, मुसा पटवेगार उपस्थित होते. सई पाटील (दोनवडे) हिने मनोगत व्यक्त केले.

कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा राखत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा विचार महाराष्ट्रात पोचविण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांतील ४० लाख नागरिक मोर्चात सहभागी होतील, असेही या वेळी सर्वांनी सांगितले. हा मोर्चा केवळ एका समाजाचा नसून संपूर्ण मराठी भाषिकांचा आहे.

जातीच्याही पुढे विचार करणारे लोक एकत्र आलेत. कोणाचे आरक्षण काढून न घेता मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही प्रमुख मागणी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. मोर्चासाठी स्टिकर, बॅनर, पाणी, खाद्यपदार्थ, वैद्यकीय सेवा, अन्य मदत पुरविण्यात येईल, असे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.     
डॉ. गिरीश कोरे, राजू वाली (लिंगायत समाज), उत्तम कांबळे, जयवंत पलंगे (खाटिक समाज), अशोक माळी, संतोष माळी (माळी समाज), अरुण कुराडे (चर्मकार समाज), वसंत कोगेकर (वडार समाज), भाऊसाहेब काळे, अरुण मछले, महेश मछले (कंजारभाट समाज), रामचंद्र पवार (लमाण समाज), अनंतराव म्हाळुंगेकर (ख्रिश्‍चन समाज), युवराज गवळी (गवळी समाज), तानाजी पोवार, अनिल चव्हाण, मदन चव्हाण, मल्लू काळे, रवी काळे (सर्व फासेपारधी समाज), रामसिंग रजपूत (रजपूत समाज), अनिल ढवण (वीरशैव वाणी समाज), राघू हाजारे (धनगर महासंघ), काशिनाथ गिरीबुवा (गोसावी समाज), शिवाजी पोळ (वीरशैव कक्कया समाज), रमेश लालवाणी, ब्रिजलाल लालवाणी (सिंधी समाज), प्राचार्य व्ही. डी. माने, सुंदरराव देसाई (खादी ग्रामोद्योग, स्वातंत्र्यसैनिक संघटना), रजनीकांत चोले (ख्रिस्ती समाज), सतीश रास्ते (बहुजन दलित महासंघ), श्रीमती गीताताई गुरव, कावेरी कुडवे, नेहा मुळीक, शैलजा भोसले, श्रीमती छाया भोसले, विजय कांबळे, दत्तात्रय इंगवले, सोनलकुमार घोटणे, किरण कांबळे, संभाजीराव चेंडके, आप्पासाहेब देसाई, मिलिंद चौगुले, आशा कुकडे, हिंदूराव पोवार (पणोरेकर), सदाशिव देवताळे, दत्ताजीराव वाझे (यादव गवळी समाज), दिलीप गवळी, बी. के. कांबळे (प्रदेश सचिव रिपाइं), शिवाजी पोळ, अंकुश कदम, बाबूराव बोडके, श्रीनाथ यमकर, शिवाजी माळकर, सौ. दीपा पाटील, संजय ओतारी, छगन नांगरे, रफीक मुल्ला, उमेश पोर्लेकर (ओबीसी संघटना), कुचकोरवी समाज, बबन सावंत (बहुजन दलित महासंघ), भाऊसाहेब काळे (आरपीआय गवई गट), कुमार आहुजा (भारतीय सिंधी समाज), अंकुश कदम (लोणार समाज), सुवर्णकार समाज, शामराव खोत (हणबर समाज उन्नती संस्था), मंगेश गुरव (गुरव समाज), खाटीक मुस्लिम समाज, संजय ओतारी, मुल्लाणी समाज, फूटवेअर दुकानधारक संघटना, श्री. मकोटे (देवांग कोष्टी समाज), बाळासाहेब शिंदे (परीट समाज), मधुकर पेडणेकर (दैवज्ञ समाज), श्री. शेलार (घिसाडी समाज), अरुण कुऱ्हाडे (चर्मकार समाज), आनंदराव जाधव (भोई समाज), दादा जगताप (डवरी समाज), शंकर पाथरवट (पाथरवट समाज), श्री. देवताळे (लिंगायत समाज), वडर समाज, बी. ए. कोळी (कोळी समाज), सज्जनसिंग चितोडिया (चितोडिया समाज), शीख समाज, श्री. माने (नाभिक समाज), राजू कुंभार (कुंभार समाज), देवदत्त माने (अपंग प्रहार संघटना), बसवराज पाटील (महादेव कोळी समाज), कऱ्हाडे ब्राह्मण समाज आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.