सोलापूरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

accident
accident

सोलापूर - भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने  मोटारसायकलवर जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तिघंही आर्किड अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. ही घटना आज (रविवार) पहाटे तळे हिप्परगा येथे झाली.

तिघं जण ग्रंथालयात रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते. चहा पिण्याची तलफ आल्यामुळे ते तिघं बाहेर पडले. चहा प्यायला गेलं असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 संगमेश माळगे (वय  2१ रा. सोलापूर) दीपक गुमडेल (वय २१ रा सोलापूर) अक्षय आसबे (वय २२ रा. पंढरपूर) ही जागेवर ठार झालेल्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com