'दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार' संदीप खरे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर आणि प्रीसिजन फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार संदीप खरे यांना जाहीर झाला आहे. रोख 11 हजार रुपये, चांदीच्या कमळाचे स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 11 जून रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार खरे यांना प्रदान केला जाईल, अशी माहिती मसाप सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी व प्रीसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. या कार्यक्रमानंतर प्रकाश पायगुडे संदीप खरे यांची मुलाखत घेणार आहेत.