कर्जमाफीवरून लोकांमध्ये नाराजी - खासदार बनसोडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सोलापूर - केंद्र सरकारच्या बाबतीत एवढ्या तक्रारी नाहीत. मात्र, राज्य सरकारबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यातल्या त्यात कर्जमाफीवरून लोकांमध्ये नाराजी असल्याचे जाणवत असल्याचे मत खासदार शरद बनसोडे यांनी व्यक्त केले.

आज त्यांनी "सकाळ' कार्यालयात संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. खासदार बनसोडे म्हणाले, 'केंद्राच्या योजनांची फळे लोकांना हळूहळू दिसायला चालू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. तरुण सोशल मीडिया एन्जॉय करतोय. मागील तीन वर्षांमध्ये सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जनता व मंत्री यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणारा लाल दिवा पंतप्रधानांनी काढून टाकला आहे. नव्या सरकारने आम्हाला स्वाभिमानाची शिकवण दिली आहे. स्वच्छतेची सवय लोकांना लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.''