वीजबंदची माहिती "एसएमएस'वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सव्वाआठ लाख ग्राहकांची नोंदणी; मराठीतही मिळणार सेवा
सोलापूर - वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस'द्वारे पाठविण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील आठ लाख 27 हजार 569 ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाली आहे.

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंपधारक व इतर असे एकूण नऊ लाख 86 हजार 302 ग्राहक आहेत. त्यापैकी आठ लाख 27 हजार 569 ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल क्रमांक नोंदविले आहेत. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती "एसएमएस'द्वारे दिली जाते. त्याचबरोबर आता तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी ग्राहकांना "एसएमएस'द्वारे सांगितला जातो. महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या "कर्मचारी मित्र' या मोबाईल ऍपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेऊन संबंधित ग्राहकांच्या मोबाईलवर वीजपुरवठा बंदबाबतचा कालावधी "एसएमएस'द्वारे कळविण्यात येत आहे.

आता मराठीतही मिळणार एसएमएस
पूर्वी केवळ इंग्रजीतूनच मिळणारे "एसएमएस' आता मराठीतूनही मिळणार आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन मराठी भाषेतही एसएमएस सेवा देण्यात येणार आहे. वीजबिल तयार होताच किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीजबिल, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्याची वेळ अशा प्रकारची माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा यंत्रणेत बिघाड झाल्यास संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा कधी सुरू होणार हेही "एसएमएस'द्वारे मराठीत कळणार आहे.

Web Title: solapur news electricity close information on mms