सोलापूरमधील आठवडी बाजार सुरळीत

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 6 जून 2017

सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून येथील मंगळवारचा आठवडी बाजार आज (मंगळवार) बंद राहिल अशी चर्चा होती. मात्र नियमितपणे आजही बाजार भरला आहे. मात्र बहुतांश वस्तुंचे भाव वाढल्याचे आढळून येत आहे. या बाजाराला मोठी परंपरा असून गेल्या दोनशे वर्षांपासून हा बाजार भरत आहे.

सोलापूरसह परिसरातील गावामधील नागरिकांची सोय व्हावी यासाठी ब्रिटीशानी 1805 मध्ये हा बाजार सुरु केला होता. या बाजारात पालेभाज्यांसह मासे, मटण, कोंबडी विक्रीची विशेष व्यवस्था आहे. त्यामुळे सोलापूरपासून जवळ असलेल्या तांदुळवाडी, मुस्ती, मंद्रप, बोरामणी, तामलवाडी या गावातून व काही प्रमाणात अक्कलकोट, मोहळ, तुळजापूर या तालुक्‍यातील नागरिकही येथे खरेदीसाठी येतात.

आजच्या बाजारातील दर : कंसात जुने दर रुपयांत
मेथी 25 रु. (10) शेपू 20 रु. (5) बटाटा 80 रु. किलो (40) वांगी 60 रु. किलो (40). कोंबडी 150 ते 350 रु. (80 ते 200) विविध प्रकारची मासळी 200 ते 800 रु. (100 ते 600)