‘जीएसटी’च्या सेलनंतर बाजारपेठा मंदावल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

सोलापूर - जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार असल्याने गेल्या महिन्यापासून बाजारपेठेत सवलतींचा पाऊस सुरू होता. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झालेल्या बाजारपेठा आज मंदावलेल्या होत्या. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर आज पहिलाच दिवस असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स, वाहन बाजार मंदावलेला दिसला. नवीपेठ, चाटी गल्ली या बाजारपेठांमध्येही नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची वर्दळ कमीच होती. सराफ व कापड बाजारातही नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या मंदावलेली होती. अडीअडचणीसाठी सोन्याची विक्री करणाऱ्या ग्राहकांना आता वाढीव भुर्दंड बसणार आहे.

‘जीएसटी’नुसार असलेली प्राईजलिस्ट अद्याप प्राप्त झालेली नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर आज पहिलाच दिवस असल्याने व्यवहार थंडच होते. सोमवारपासून व्यवहार सुरळीत होतील. 
- राजेंद्र सोमाणी, अत्रे असोसिएट्‌स

‘जीएसटी’मुळे विक्रेत्यांची जबाबदारी वाढली असून त्यांना दर महिन्याला तीन याप्रमाणे वर्षाला ३६ रिपोर्ट द्यावे लागणार आहेत. व्यवसायाची माहिती दरमहा अद्ययावत ठेवावी लागणार आहे. सोने विक्री करणाऱ्यांना जीएसटीमुळे फटका बसणार आहे.   
- गिरीश देवरमनी, अध्यक्ष, सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशन

आजपासून मॉन्सून सेलला सुरवात झाली. या सेलमध्ये खरेदी केल्यानंतर जीएसटीची आकारणी करून बिल देण्यात आले. ग्राहकांना काही शंका होत्या. त्यांच्या या शंकांचे निरासन केल्यानंतर त्यांनी हे बिल स्वीकारले. 
- गिरीश पवार, व्ही. आर. पवार साडी सेंटर