इंदिरा गांधी, डॉ. वसंतदादा पाटील जन्मशताब्दी समारोप सोलापुरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

या कार्यक्रमासाठी श्रीमती पाटील रविवारी दुपारी अडीच वाजता रेल्वेने
दाखल होणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता रेल्वेनेच ते मुंबईकडे रवाना
होणार आहेत. इतर मान्यवर त्यांच्या सोईने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
आहेत.

सोलापूर - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी समारोप कार्यक्रमाचे
आयोजन उद्या (रविवार) सोलापुरात करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती
प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
आहेत.

येतील वोरोनोको प्रशालेत दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम होईल. अखिल
भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश, स्व.
वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्ष समारोप समितीचे अध्यक्ष तथा कॉग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण,माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील,
विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव
पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी सभापती
शिवाजीराव देशमुख, परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आमदार
पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत
भालके उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी श्रीमती पाटील रविवारी दुपारी अडीच वाजता रेल्वेने
दाखल होणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता रेल्वेनेच ते मुंबईकडे रवाना
होणार आहेत. इतर मान्यवर त्यांच्या सोईने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी
दुपारी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली व आवश्‍यक सूचना संबंधितांना दिल्या.