"महानंद'कडून दूध दरात दोन रुपयांची कपात 

संतोष सिरसट
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपाच्या रेट्यामुळे शासनाने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दुधाच्या खरेदी दरामध्ये तीन रुपये वाढीचा निर्णय 19 जूनला घेतला होता. गाईच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरून थेट 27 रुपये केला होता. मात्र, त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने (महानंद) सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली आहे. 

"महानंद'ने या खरेदी दरातील कपातीची अंमलबजावणी आठ सप्टेंबरपासून सुरू केली आहे. "महानंद' ही सरकारी संस्था आहे. राज्यातील 12 सहकारी संघाकडून "महानंद'च्या वतीने दुधाची खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या दुधाचे ते विक्री करतात. दररोज साधारणपणे दोन लाख दहा हजार लिटर दुधाची खरेदी "महानंदा' करते. खरेदी केलेले दूध ते ग्राहकांना विकतात. "महानंद'ची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे सहकारी संघाकडून दुधाची खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे. दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. पण, त्या प्रमाणात सहकारी संघांना देण्यासाठी पैसेच "महानंद'कडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याकडून दुधाच्या खरेदी दरामध्ये दोन रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दूध उत्पादकांना द्यावे पाच रुपये अनुदान 
कर्नाटक, गोवा या राज्यांबरोबरच तेलंगण, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्येही प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील राज्य सरकारने दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: solapur news mahanand milk