"कर्जमुक्तीसाठी मुहूर्त कशाला?'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सोलापूर - शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी 31 ऑक्‍टोबरचा मुहूर्त कशाला हवा, अशी विचारणा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस तथा निरीक्षक मोहन जोशी यांनी केली.

सोलापूर - शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी 31 ऑक्‍टोबरचा मुहूर्त कशाला हवा, अशी विचारणा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस तथा निरीक्षक मोहन जोशी यांनी केली.

सोलापुरात आयोजित कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'भाजप सरकारला शेतकरी कर्जमुक्त करायचे असते तर त्यांनी मुर्हूत पाहिले नसते. तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही केली असती. मात्र भाजपचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे. येत्या निवडणुकीत मतदारच आता त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू. आम्हाला जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे विरोधात बसूनच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, ध्येय धोरणे राबवू. पाच वर्षे हीच आमची भूमिका राहील.''