रेशन दुकानांमध्ये मिळणार तूरडाळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सोलापूर - सर्वसामान्यांना कमी दरात चांगल्या दर्जाची तूरडाळ मिळावी. यासाठी सरकारकडून राज्यातील सर्व रेशन दुकानांवर प्रतिमहिना, प्रति शिधापत्रिकाधारकाला एक किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर चर्चा करून एक किलो पॅकिंगमध्ये तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

राज्यात सरकारने मोठ्या प्रमाणावर हमीभावाने तूर खरेदी केली आहे. सरकारच्या विविध विभागांना आवश्‍यक असलेली तूरडाळ मागणी आणि प्राप्त खरेदी दर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश पणनमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. तूर भरडई व पुरवठा याबाबतची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्या वेळी हे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, गृह विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग यांची तूरडाळीची मोठी मागणी आहे. या विभागांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दराचा आणि मागणीचा प्रस्ताव संबंधित विभागांनी तत्काळ तयार करावा आणि ज्या विभागाची मागणी आहे, त्या विभागाचे एकत्रित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले.