सहकार मंत्र्यांसमोर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पैसे घेतल्याची कबुली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

ऑपरेटरकडून मानधनाची मागणी 
या केंद्रात असलेल्या ऑपरेटरने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मानधन देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना हे केंद्र चालवत असल्याचे त्याने सांगितले. कदाचित त्यामुळे त्याला शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याची वेळ येत असावी, अशीही चर्चा त्याठिकाणी होती.

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी घेतली होती. त्याद्वारे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पैसे घेणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली होता. मात्र, आज दस्तरखुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोरच अर्ज भरण्यासाठी पैसे घेत असल्याची कबुली पैसे घेणाऱ्यानेच दिली. 

सहकारमंत्री देशमुख यांनी आज कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या महा-इ-सेवा केंद्राला भेट दिली. तेथे गेल्यानंतर अर्ज भरण्यास आलेल्या शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांसमोर ऑनलाइन अर्ज भरताना पैसे घेतले जात असल्याची तक्रार केली. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी संबंधिताला विचारल्यानंतर आपण यासाठी पैसे घेत असल्याचे त्याने कबूल केले. काहीवेळाने सहकारमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. कुरनूर येथील केंद्रात सहकारमंत्र्यांना आलेला अनुभव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला. याचवेळी तेथील शेतकऱ्यांनी हे केंद्र बंद न करता चालूच ठेवण्याची विनंतीही सहकारमंत्र्यांना केली. त्यामागे त्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिसून येते होत्या.

कुरनूर येथील केंद्र बंद केल्यानंतर त्यांना अर्ज भरण्यास अक्कलकोटला जावे लागते. अक्कलकोटला जाण्यायेण्याचा खर्च व वेळ वाया जातो. त्यामुळे काहीही करा पण ते केंद्र सुरू ठेवण्याची विनंती त्यांनी केली. सहकारमंत्र्यांचा फोन झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलकोट तालुक्‍याच्या तहसीलदारांना फोन करून संबंधित केंद्रात काम करणाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना केली. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पैसे संबंधित केंद्र चालकाने घेतले आहेत. त्या शेतकऱ्यांना ते पैसे परत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिली. ऑनलाइन अर्ज भरण्यास पैसे घेण्याच्या कारणावरून केंद्र चालक व शेतकऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली. शेवटी सहकारमंत्र्यांनी हस्तक्षेप करून या विषयावर पडदा टाकला. 

ऑपरेटरकडून मानधनाची मागणी 
या केंद्रात असलेल्या ऑपरेटरने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मानधन देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना हे केंद्र चालवत असल्याचे त्याने सांगितले. कदाचित त्यामुळे त्याला शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याची वेळ येत असावी, अशीही चर्चा त्याठिकाणी होती.

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची...

02.00 PM

अकोले : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू...

01.24 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM