'स्वच्छ विद्यालय'साठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सोलापूर - राष्ट्रीय पातळीवरील दिल्या जाणाऱ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांनी 31 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. एक सप्टेंबरपासून यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. शासकीय व अनुदानित शाळांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी 2016-17 या वर्षी राज्यातील 15 शाळांची निवड झाली आहे.

केंद्र सरकारने 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील शाळांना "स्वच्छ विद्यालय' पुरस्कार दिले जातात. केंद्राने दिलेल्या निकषानुसार राज्यातील सर्व शाळांसाठी "स्वच्छ विद्यालय' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 31 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. या पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 100, राज्य पातळीवर 40 तर जिल्हा पातळीवर 48 शाळांची निवड केली जाणार आहे.

Web Title: solapur news swatch vidyalaya