माढा तालुक्यातील वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

file photo
file photo

टेंभुर्णी (सोलापूर): माढा तालुक्यातील चोभेपिंपरी येथील देवकर वस्तीवर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून टाकून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे तीन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी चाकू आणि कुर्हाडीचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने वृध्ददांपत्याला जबर मारहाण करून जखमी केले.

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात याप्रकरणी सहा अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोभेपिंपरी येथील देवकर वस्तीवरील सुनिल किसन देवकर (वय-37 रा. रेल्वे लाईन जवळ देवकर वस्ती, चोभेपिंपरी) यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुनिल देवकर यांचे वडील किसन एकनाथ देवकर (वय-70) व आई विमल किसन देवकर (वय- 65) यांना चाकू व कुर्हाडीचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले. घरातील सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सुमारे तीन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला.

या प्रकारणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सुनिल देवकर यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद खोबरे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com