सोलापूर स्मार्ट सिटीच्या कामाला 25 जुन चा मुहुर्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या या कामासाठी रंगभवन चौक ते डॉ. आंबेडकर चौक हा मार्ग तब्ब्ल दीड वर्षे बंद ठेवावा लागणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे

सोलापूर : "सोलापूर स्मार्ट सिटी' प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होण्याचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे. येत्या 25 जून रोजी रंगभवन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचा विकास व एका उड्डाण पुलाचे भुमीपूजन होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे तांत्रिक अधिकारी तपन डंके यांनी आज (शुक्रवार) सकाळला दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या या कामासाठी रंगभवन चौक ते डॉ. आंबेडकर चौक हा मार्ग तब्ब्ल दीड वर्षे बंद ठेवावा लागणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंगभवन ते डफरीनपर्यंतच्या रस्त्याचा विकास होईल. याचवेळी हरिभाई देवकरण प्रशालेसमोर उड्डाणपूल व सायकल ट्रॅकचे काम केले जाणार आहे. येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या नियोजनावर शिक्कामोर्तब होईल, असे डंके यांनी स्पष्ट केले.