सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

शहर पोलिस आयुक्त म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारल्यानंतर सुधीर हिरेमठ यांनी मटका-जुगार, घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर, हातभट्टी दारू विक्री, रस्त्यालगत हातगाडे लावून वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांसह बेशिस्त दुचाकी चालकांवर कारवाया सुरु केल्या आहेत. शहरातील सातही पोलिस ठाण्याचे अधिकारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत.
सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

सोलापूर : शहर पोलिस आयुक्त म्हणून तात्पुरता पदभार स्वीकारल्यानंतर सुधीर हिरेमठ यांनी मटका-जुगार, घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर, हातभट्टी दारू विक्री, रस्त्यालगत हातगाडे लावून वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांसह बेशिस्त दुचाकी चालकांवर कारवाया सुरु केल्या आहेत. शहरातील सातही पोलिस ठाण्याचे अधिकारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे शहरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे. दोन दिवसांत त्यांनी ५० पेक्षा अधिक कारवाया करून अनेकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका
रुग्णवाढीमुळे निर्बंध अटळ! एक कोटी व्यक्तींनी लस घेतलीच नाही

घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

सोलापूर : नई जिंदगीतील आनंद नगर भाग-तीन येथे घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करून ॲटोरिक्षात भरताना एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. अहमद अब्दुल जब्बार सय्यद (रा. आनंद नगर, नई जिंदगी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी एक ॲटोरिक्षा (एमएच १३, सीटी ५८८०) जप्त केली असून त्यासोबतच दोन गॅस टाक्या आणि वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने तपास करीत आहेत.

---

कुमठा नाक्याजवळ मटका खेळणाऱ्यांवर गुन्हा

सोलापूर : कुमठा नाका परिसरातील लेप्रसी कॉलनीजवळील कचरा डेपो परिसरात कल्याण नावाचा मटका चालवून ये-जा करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संजय विठ्ठल सुरवसे, दुर्गादास कोलूर या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आज (शनिवारी) पोलिसांनी ही कारवाई केली. तेथून साडेबाराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस हवालदार आटुळे तपास करीत आहेत.

सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका
बारावीचा निकाल ७ जूनला? चित्रकलेच्या गुणांमुळे लांबणार दहावीचा निकाल

वाहतूक कोंडी करणाऱ्यांना दणका

सोलापूर : शहरातील बेशिस्त वाहनचालकांसह रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर नूतन पोलिस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पदभार घेतल्यापासून सात पोलिस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कारवाया सुरू केल्या आहेत. जुळे सोलापुरातील वैष्णवी प्लाझा, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, गुरुनानक चौक, नीलमनगर, जोडबसवण्णा चौक, भारतरत्न इंदिरा नगर झोपडपट्टी, वालचंद कॉलेज रोड, पार्क चौक, नवीपेठ, सिटी पार्क हॉटेलच्या बोळात बेशिस्त वाहनचालकांवर तथा रस्त्यात वाहन उभे केलेल्यांसह हातगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाया केल्या. त्यानुसार विजापूर नाका, जेलरोड, फौजदार चावडी, एमआयडीसी, जोडभावी पेठ व सदर बझार पोलिसांनी शांतेश्वर सूर्यकांत शिरोळे, प्रशांत बाबूराव कोकरे, मोसिन शफीक फुलारी, मोहम्मद रुफीक नूरमहोम्मद कलादगी, शुक्राचारी भीमा शिंदे, अखलाख इस्माईल मुल्ला, शंकरलिंग महादेवअप्पा करजगी, खलील सय्यद हुसेन बेंगलोरवाले, राहुल कृष्णा चिलगाने, प्रवीण नरेश गोंडा, फैय्या रियाज कंपली, सागर नरसिंह मिठ्ठा, कृष्णा गोविंद सूर्यवंशी, लक्ष्मण रतिराम पडोरे, राहुल श्‍यामराव आडके, दत्तप्रसाद श्रीकृष्ण चाकोटकर, आकाश मारुती उंदीरवाडे, चेतन लक्ष्मीनारायण गुर्रम, अभिषेक देवासिंग रजपूत, सुहास त्रिंबक शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका
सरकारमध्ये २.७२ लाख पदे रिक्त! दोन टप्प्यात होणार मेगाभरती

बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाया

संजय बाबूराव टकले (रा. वरळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) याने दुसऱ्यांना धोका होईल अशी दुचाकी चालविली. जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com