सोलापूर : रिक्षातील पुढील आसन धोकादायक

वाहतूक पोलिसांकडून बघ्याची भूमिका बेकायदेशीर वाहतूक सुरुच
रिक्षा
रिक्षा sakal

सोलापूर : रिक्षांमधून केवळ तीन प्रवाशांना घेऊन जाण्याची मुभा आहे. मागील दोन वर्षात कोरोना रुग्ण वाढत असल्याने परिवहन विभागाकडून एका रिक्षात केवळ तीन प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी दिली. पण, शहरात चार ते पाच प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शहरात वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई होऊनही रिक्षाचालक जुमानत नसल्याचे चित्र आहे. शहरातील पांजरापोळ चौक ते सात रस्ता, बाळीवेस, रंगभवन चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौक, विजापूर वेस, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक अशा विविध भागांमध्ये रिक्षा चालविल्या जातात. रिक्षामध्ये जादा भाडे मिळते, म्हणून सर्रास प्रवासी भरले जातात. यातून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रिक्षा चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून वाहतूक करणे धोकादायक आणि बेकायदेशीर आहे.

तरीही रिक्षांमधून सर्रास वाहतूक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पांजरापोळ चौक ते मार्केट यार्ड दरम्यान विद्यार्थी, नोकरदार, सामान्य प्रवासी मोठ्या प्रमाणावर रिक्षात जादा भरुन प्रवास केला जातो. जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई गरजेची असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांनी उपस्थित केला आहे. रिक्षाचालकांनी तीन प्रवासी घेतले तर कमी भाडे मिळते. मात्र अधिक प्रवासी घेतले तर जादा भाडे मिळते याच लालसेपोटी प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवासी घेण्यासाठी रिक्षा चालक अचानक रस्त्यामध्ये थांबत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय होते कारवाई

ज्यादा प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दोनशे ते दोन हजार रुपयांचा दंड आकारला जातो. तर रिक्षातून पुढील आसनावर बसवून प्रवासी नेल्यास पहिल्यांदा पाचशे आणि दुसऱ्यांदा दीड हजार रुपये दंड आकारला जातो.

परवानगीनुसार रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक करावी. जादा प्रवासी नेणे बेकायदेशीर असून अपघाताला निमंत्रण देणारे आहे. त्यामुळे अशी वाहतूक करणारे रिक्षाचालक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- अजय परमार, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com