ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची शाळकरी मुलाला धडक; विद्यार्थ्यांचा मृत्यू

अवजड वाहतूकीचा बळी,शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
Accident
Accidentesakal

मंगळवेढा : शहरातील ज्ञानदीप विदयालयातून सायकलवरून घरी परताना नागणेवाडी येथे एका बिगर नंबरच्या ऊस भरलेल्या ट्रॅक्टरने 14 वर्षीय शाळकरी मुलाला जोराची धडक देवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.कृष्णा सनतकुमार थिटे वय 14 असे मयताचे नाव आहे.एकुलत्या मुलाच्या जाण्याने थिटे कुटुंबाचा आधार गेला.

या प्रकरणाची फिर्याद सनतकुमार थिटे यांनी दिली असून मयत कृष्णा थिटे रा.फुगारे गल्ली हा कारखाना रोडवरील ज्ञानदीप स्कूलमध्ये इयत्ता 8 वी च्या वर्गात शिकत असून दुपारी 1.30 वा.शाळेतून परत घरी रेंजर सायकलवरून येत असताना नागणेवाडी येथील श्रीजल पाणी फिल्टरच्या समोर ऊसाने भरलेल्या लाल रंगाच्या बिगर नंबरच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होवून मयत झाला.फिर्यादी यास एकच मुलगा असल्याने काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याची फिर्याद वडील सनतकुमार थिटे यांनी दिल्यावर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातून अजूनही अवजड वाहने येत आहेत पोलिसांनी पंढरपूर रोडला अवजड वाहनाने शहरात प्रवेश करू नये म्हणून लोखंडी बॅरिकेट लावले होते परंतु रात्रीच्या वेळी पोलिस नसतानाची संधी साधून अज्ञात वाहनाने ते बॅरिकेट मोडून टाकले मात्र त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे सध्या शहरातून अवजड वाहने भरधाव जात असून याचा फटका कृष्णा थिटे या शाळकरी मुलाचा बसला. वाहतूक शाखेचे पोलिस काना डोळा करीत असल्याने शहरात रात्रंदिवस ही वाहने जात आहेत. सध्या शाळा चालू झाल्याने दामाजी चौकात विदयार्थ्याची गर्दी व प्रवाशांची वर्दळ असते. शहरालगत बाहेरून अवजड वाहनांना जाण्यासाठी कोटयावधी खर्चून बाह्यवळण मार्ग रस्ते तयार करूनही शहरामध्येच ही वाहने येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com