सोलापूर -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दाणादाण

सोलापूर ते मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना पाण्यात रस्ता काढून जाण्याचे जिकरीचे झाले
Water on Highway
Water on HighwaySakal

ब्रह्मपुरी (सोलापूर) - सोलापूर -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण काम झाल्याचे बोळवण करत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी या मार्गावर दुर्लक्ष केले आहे. सोलापूर ते मंगळवेढा या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसाने महामार्गावरील असणाऱ्या ब्रह्मपुरी, माचनुर व बेगमपूर आदी गावांना पहिल्याच पावसात दाणादाण उठली असून रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रवाशी वर्गांना व गावकऱ्यांना पाण्यात रस्ता काढून जाण्याचे जिकरीचे झाले असून त्याचा मनस्ताप व त्रासास सामोरे जावे लागत आहे.

बेगमपुर, ब्रह्मपुरी दरम्यान असणाऱ्या महामार्गाचे काम अजूनही दोन्ही बाजूंनी डीवाईडर नसणे, रस्ता खोदणे, रस्त्यावर जड वाहनांची पार्किंग करणे आदी समस्यांना सामोरे जात असतानाही सोयीस्कररीत्या दुर्लक्षित होत आहे. महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गास अडचणीचा ठरत असून छोटे-मोठे अपघात होत आहे हे माहीत असूनही काम झाल्याचे गवगवा करीत आहे. अजूनही महामार्गावरील काम अंतिम टप्प्यात झाले नाही. तरीही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी काम झालेले आहे असे झटकत आहे.

रविवारी दुपारी पडलेल्या पावसाने बेगमपूर पुल परिसरात वाहतुकीदरम्यान प्रवासी वर्गांना प्रवास करणे जिकरीचे होत असून सदर पाणी ची विल्हेवाट योग्यरीत्या न केल्यामुळे रस्त्यावर पाण्याने डबक्याचे स्वरूप आले होते तसेच ब्रह्मपुरी दरम्यान भीम नगर ते एसटी स्टँड दोन्ही बाजूनी पावसाच्या पाण्याने गावाकडील सर्विस रोड वरती पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना रस्ता शोधणे मुश्कील झाले होते तसेच सदर प्राण्याचे ड्रेनेज योग्य रीतीने काम न केल्यामुळे रस्त्यावरील पाणी पुढे जात नसल्यामुळे ब्रह्मपुरी येथील भिमनगर वस्तीमधील घरामध्ये तसेच ब्रह्मपुरी, माचनुर येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याने प्रवेश केल्यामुळे नुकसानीस जावे लागत आहे.

ब्रह्मपुरी येथील प्रमुख चौकात दोन्ही बाजूचा रस्त्याचे खोदकाम चालू असून काम अर्धवट स्थितीत आहे. गावकऱ्यांना दोन्ही बाजूने महामार्गावर जाण्यासाठी कसरत करावी लागत असून योग्य दिशा दर्शक फलक लावून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी याची तपासणी करून राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित प्रवासी वर्गासाठी खुला करून द्यावा असे ब्रह्मपुरी , माचनूर परिसरातून नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com