पासपोर्टसाठी ऑन द स्पॉट चौकशी

सचिन शिंदे
मंगळवार, 29 मे 2018

पासपोर्ट काढायचा म्हटलं की, त्यासाठी लागणाऱ्या पोलिसांच्या चौकशी अहवाल अत्यंत वेळ खाऊ काम. पोलिसांना वेळ असेल तेव्हा त्याची चौकशी होणार, अशी त्याची स्थिती होती. त्यासाठी किती वेळ लागेल याचा नेम नव्हता. मात्र आता तसे होणार नाही.

कऱ्हाड - 'नमस्कार मी, शहर पोलिस ठाण्यातून बोलतो आहे, आपली पासपोर्टची चौकशी आली आहे, आपल्याला वेळ केव्हा आहे', अशा विनंतीचा पोलिसांचा कॉल लोकांना जातो. त्यावेळी त्या लोकांना आनंद होतो आहे, ही किमया साध्य झाली आहे. ती पासपोर्टसाठीची पोलिसांची होणारी चौकशी आता ऑन दी स्पॉट होत आहे. शासनाचे प्रत्यक्ष स्थळी जाऊन पासपोर्टला अर्ज देणाऱ्याची चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्यांदा कऱ्हाडला ती सुविधा नागरीकांना खुली केली आहे. त्या सुविधेचे पोलिसांसह नागरीकांतूही स्वागत होत आहे. 

पासपोर्ट काढायचा म्हटलं की, त्यासाठी लागणाऱ्या पोलिसांच्या चौकशी अहवाल अत्यंत वेळ खाऊ काम. पोलिसांना वेळ असेल तेव्हा त्याची चौकशी होणार, अशी त्याची स्थिती होती. त्यासाठी किती वेळ लागेल याचा नेम नव्हता. मात्र आता तसे होणार नाही. शहर पोलिस आता थेट ऑन द स्पॉट जाऊन पासपोर्टची चौकशी करून त्याची माहिती ऑनलाईन भरत आहेत. त्यामुळे कामातील सुलभता वाढली आहे. शहर पोलिस ठाण्यात किमान रोज दहा तरी पासपोर्टचे फॉर्म चौकशीसाठी येत आहेत. दरवर्षी त्याची संख्या हजारात असते. त्या सगळ्या गोष्टीसाठी गोपनीय शाखेचे किमान चार ते पाच कर्मचारी नेमले जातात. त्यामुळे त्या कामातील सुसूत्रता येत नव्हती. प्रत्येकवेळी आलेल्या व्यक्तीचे काम होईलच किंवा येणाऱ्या व्यक्तीचे समाधान होईलच, याची गॅरंटी नव्हती. पोलिसांसाठी ते काम जिकरीचे ठरत होते.

पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांनी पुढाकार घेवून पासपोर्टसाठी येणाऱ्या चौकशा ऑन दी स्पॉट जावून करण्याचे ठरवले. अर्थात शासनाने तशा सुचना दिल्या होत्या. त्यासाठी जिल्हा पातळीवरही काही डायरेक्शनस् आल्या आहेत. आलेल्या सुचनेनुसार कामात बदल करण्याचे धाडस जिल्ह्यात सर्वात आदी शहर पोलिसांनी दाखवले. त्यासाठी त्यांनी त्याचे नियोजोनही केले. गोपनीय शाखेकडे पासपोर्टला चौकशी कामी अर्ज आला की, त्या शाखेचे कर्मचारी थेट त्या व्यक्तींना कॉल करतो. तुम्हाला वेळ कधी आहे. तुमची पासपोर्टची चौकशी करायची आहे. घरी यावे लागले, असे तो कर्माचारी पलीकडून सांगतो. त्यावेळी लोकही खूष होताना दिसत आहेत. संबधित कर्माचारी त्या लोकांची घरी जातात. त्याची सगळी माहिती टॅबवर घेतली जाते. ती ऑनलाईन भरलीही जाते. त्याची एक प्रत पोलिस टाण्यात असेत. त्या प्रतिवर पोलिस निरिक्षकांची स्वाक्षरी घेवून ती रेकॉर्ड केली जाते. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाल्याची भावना त्यांच्याकडूनही व्यक्त होत आहे. पासपोर्टवरून अनेक अधिकाऱ्यांना नाहक निलंबीत होण्याची वेळ आली होती. मात्र त्यालाही चाप बसण्यास मदत होणार आहे. 

पोलिसांच्या कामाच्या पद्धतीही आता ऑन दी स्पॉट चौकशीमुळे अधिक सुलभता आली आहे. नागरीकांनाही त्याचे समाधान वाटत आहे. पासपोर्टच्या चौकशीत काही पोलिसांना नाहक त्रास व्हायचा तोही आता या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे पोलिस व नागरीकातून त्याचे स्वागत होत आहे. - प्रमोद जाधव, पोलिस निरिक्षक, कऱ्हाड 

Web Title: On the spot passport available at karhad