उजनी आज 90 टक्के भरण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण उद्या (ता. 29) 90 टक्के भरण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात 81.78 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो सायंकाळी सहा वाजता 85.37 टक्‍क्‍यांवर पोचला होता. सायंकाळी सहा वाजता 33 हजार क्‍युसेकने पाणी दौड येथून धरणात येत होते. धरण 90 टक्के भरल्यानंतर धरणातून नदीमध्ये पाणी सोडले जाऊ शकते किंवा कालव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढविला जाण्याची शक्‍यता आहे.