‘कोल्हापूर-हिंजवडी’ मुळे वाढला गल्ला

‘कोल्हापूर-हिंजवडी’ मुळे वाढला गल्ला

आयआयटीन्सचा प्रवास सुलभ; महिन्याला ८ ते १२ लाखांचा महसूल जमा

कोल्हापूर - एसटी महामंडळाने सुरू केलेल्या कोल्हापूर-हिंजवडी या निमआराम गाडीला आयआयटीयन्सचा प्रतिसाद लाभत आहे. त्यापाठोपाठ गडहिंग्लज, इचलकरंजी व कुरुंदवाड भागातून हिंजवडीसाठी रोज नवीन एक गाडी सोडली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे-हिंजवडी मार्गावरील आयआयटीयन्सबरोबर नोकरदारांची सोय झाली आहे. एसटी महामंडळाच्या महसुलात महिन्याकाठी ८ ते १२ लाखांची भर पडली आहे. दर आठवड्याला १० ते १२ हजारांवर प्रवाशांची ये-जा होत आहे. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. यात पुणे आयआयटीयन्ससाठी हब बनले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी वर्गापासून ते दुर्गम भागातील नोकरदार वर्गासाठी एसटी महामंडळाने खास बसगाड्यांची सोय केली आहे. बहुतांशी वर्ग पुण्यात - हिंजवडी येथे उतरणार असल्याने एसटीने सुरवातीला कोल्हापूर-हिंजवडी या मार्गावर बस सुरू केली आहे. या बसने ये-जा करणाऱ्यांपैकी अक्षय मोर्चे व कपिल गुरव या आयआयटीयन्सनी पुढाकार घेत वॉटस्‌ ॲप ग्रुप बनविला. या ग्रुपवर एसटीचे अधिकारी जॉईन केले. त्यामुळे कोल्हापूर-हिंजवडी किंवा हिंजवडी-कोल्हापूरही गाडी किती वाजता बस स्थानकात फलाटावर लागणार आहे, इथंपासून आरक्षणपर्यंतच्या सर्व बाबी वॉटस्‌ ॲपवर माहिती सेंड केली जाते. त्यामुळे एखाद्या आयटीयन्स कार्यालयात जरी असला तरी त्याला गाडी सुटण्याची वेळ समजू शकते. 

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून हिंजवडीला रोज दोन गाड्या सुटतात, मात्र ग्रामीण भागातून कोल्हापुरात येण्यापेक्षा तेथूेन त्याने थेट हिंजवडीला जाता येण्यासाठी गडहिंग्लज हिंजवडी, इचलकरंजी-हिंजवडी व कुरुंदवाड-हिंजवडी या तीन नवीन बस सुरू झाल्या आहेत. त्याला आयआयटीयन्सचा प्रतिसाद आहे. 

पुणे विभागाचे दुर्लक्ष 
कोल्हापूर-हिंजवडी गाडी सकाळी साडेदहाच्या सुमारास हिंजवडीत पोचते तर सायंकाळी साडेचार वाजता निघालेली गाडी कोल्हापुरात रात्री नऊ पर्यंत पोचते. हिंजवडी हा पुण्यातील मुख्य थांबा आहे. तेथून आयआयटीयन्स शनिवारी, रविवारी या साप्ताहिक सुट्यांना गावाकडे येतात. त्यामुळे शुक्रवारी साडेपाचशेवर आयआयटीन्स हिंजवडीतील थांब्यावर येतात. तेथे एसटी महामंडळाच्या पुणे आगाराकडून अद्याप शेड बांधलेले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांकडून तेथेच थांबावे लागते. लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या आयआयटीन्ससाठी अवघ्या काही हजार रुपये खर्चाचे शेड उभारण्यात एसटी पुणे विभागाकडून झालेले दुर्लक्ष प्रवाशांच्या टिकेचा विषय बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com