स्थायी सभापतिपदासाठी कॉंग्रेसमधील इच्छुक वाढले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सांगली - स्थायी समिती सभापतिपदासाठी कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली आहे. आज युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी अस्मिता बंगल्यावर कॉंग्रेसच्या सर्व नऊ सदस्यांची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे अनुक्रमे पाच व दोन सदस्य आहेत. त्यांचे कॉंग्रेसमधील हालचालींवर लक्ष आहे. 

सांगली - स्थायी समिती सभापतिपदासाठी कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली आहे. आज युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी अस्मिता बंगल्यावर कॉंग्रेसच्या सर्व नऊ सदस्यांची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे अनुक्रमे पाच व दोन सदस्य आहेत. त्यांचे कॉंग्रेसमधील हालचालींवर लक्ष आहे. 

  
पालिका व विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या स्थायी समिती सभापती सोमवार मुहूर्त मिळाला आहे. उद्या दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक होणार आहे. स्थायीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. सर्व नऊ सदस्य मदन पाटील गटाचेच आहेत. उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीचा नेमका पवित्रा स्पष्ट नाही. सभापतिपदाचे सर्वांत प्रबळ दावेदार दिलीप पाटील आहेत. सभापतिपद देण्यासाठीच स्थायीत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वेळी त्यांनी नेते मदन पाटील यांच्या शब्दाखातर संतोष पाटील यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. कॉंग्रेसमधील मदन पाटील गटाचे राष्ट्रवादीशी वाढते सख्य विचारात घेता त्यांच्याकडून ही निवडणूक लढवली जाईल का, हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. कॉंग्रेसमधील उपमहापौर गटाला स्थायीत स्थान नाही; मात्र त्यांच्यासोबत असलेले स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य ही जमेची बाजू असेल. कॉंग्रेसमध्ये पदासाठी रस्सीखेच सुरूच झाली, तर एखाद्या गटासोबत ते निवडणुकीचा गेम खेळू शकतात. राष्ट्रवादीतून राजू गवळी यांनी जमली तर गेम करायची तयारी केली आहे. 
 

कॉंग्रेसमधून निर्मला जगदाळे, अतहर नायकवडी अन्य इच्छुक आहेत. नायकवडी यांच्यासाठी राष्ट्रवादी कधीही वर्ज्य नाही. तथापि, राष्ट्रवादीचे मदन पाटील गटाशी सूर जुळले असल्याने अनपेक्षित काही घडण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. मात्र आज कॉंग्रेस इच्छुकांनी स्वतंत्रपणे चर्चा केल्याने चुरस वाढली आहे. उद्या नेत्या जयश्री पाटील सभापतिपदाचा कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर करतील. 

"अमृत'वर लक्ष 
पुढील वर्षभरात अमृत योजनेच्या 103 कोटींच्या निविदा निघणार आहेत. त्यामुळेच इच्छुकांची संख्या वाढली आहे. या निविदा प्रक्रियेबाबत सदस्यांकडून शब्द घेतला जाण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीमध्येही इच्छुकांचा त्यामुळेच निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढला आहे. 

Web Title: Standing for the post of Congress candidate increase