अवैध दारूविक्री थांबवा - हजारे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

राळेगणसिद्धी - समाजातील सध्याचे बहुतेक गुन्हे, महिलांवरील अत्याचार आणि अपघात दारू किंवा त्यासारख्या व्यसनांमुळेच होत आहेत. अवैध दारू व्यवसायाला गांभीर्याने प्रतिबंध केल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी, अपघात कमी होतील, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी व्यक्त केले. 

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सकाळी हजारे यांची भेट घेतली, त्या वेळी हजारे बोलत होते. त्यांनी शर्मा यांना राळेगणसिद्धीच्या विकासाची वाटचाल, त्यासाठीचे प्रयत्न, केलेली आंदोलने व त्याचा परिणाम यांची माहिती दिली. अवैध व्यवसाय व अवैध दारूविक्री यावर नियंत्रण आणण्याची मागणी हजारे यांनी केली. त्यावर शर्मा म्हणाले, ""मी जातीने लक्ष घालून अवैध व्यवसायांविरुद्ध कडक कारवाई करीन.'' 

ग्रामरक्षक दलाचा कायदा कसा तयार झाला, त्यातील कलमे व त्यांची अंमलबजावणी कशी करावी, याबाबतही हजारे यांनी सांगितले. हा कायदा योग्य प्रकारे राबविला व प्रत्येक गावात चांगले ग्रामरक्षक दल झाले, तर पोलिस यंत्रणेवरील ताण कमी होईल. गुन्हेगारीसही त्यामुळे आळा बसेल, असेही ते म्हणाले. शर्मा यांनी चांगले काम करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Stop illegal liquor sale - Hazare