सुभाषचंद्र बोस - क्रांती लढ्यातील धगधगते पर्व 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कोल्हापूर - नेताजी सुभाषचंद्र बोस हे क्रांती लढ्यातील धगधगते पर्व होते. अशा शब्दांत महापौर हसीना फरास यांनी गौरव केला. सुभाषचंद्र बोस यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे मिरजकर तिकटी चौकातील हुतात्मा स्मारक येथे बोस यांना अभिवादन करण्यात आले. फरास म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी आझाद हिंद सेना स्थापन करून इंग्रजांना जेरीस आणले. क्रांतीलढ्यातील ते एक धगधगते पर्व होते. 

महापौर तसेच उपमहापौर अर्जुन माने, यांनी नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेचे सचिव पद्माकर कापसे, कार्याध्यक्ष रामेश्‍वर पत्की, यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

संस्थेचे संस्थापक किसन कल्याणकर यांनी बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रप्रेम जागृत ठेवावे, असे आवाहन केले. सभागृह नेता प्रवीण केसरकर, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, शिक्षण समिती सभापती अजिंक्‍य चव्हाण, विजय खाडे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेविका सुनंदा मोरे, अश्‍विनी बारामते, सूरमंजिरी लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास, संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामाणे, उपाध्यक्ष दुर्वास कदम, जयकुमार शिंदे, फिरोजखान पठाण, अनिल कोळेकर, संभाजीराव जगदाळे, राहुल चौधरी आदी उपस्थित होते. 

Web Title: Subhas Chandra Bose