‘प्रधानमंत्री आवास’साठी मिळणार सबसिडी - वैजयंती महाबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कऱ्हाड - प्रधानमंत्री आवास योजनेतून ज्या कुटुंबाचे उत्पन्न तीन व सहा लाखांच्या आत आहे, त्यांना लाभ मिळू शकतो. सहा लाखांच्या कर्जावर १५ वर्षांच्या मुदतीसाठी दोन लाख २० हजार रुपये सबसिडी मिळू शकते. सहा लाखांवरील उर्वरित रकमेवर बॅंकेच्या गृहकर्जाच्या दराने व्याज भरावे लागेल. राज्यातील २५६ शहरांत ही योजना लागू आहे. संबंधित घर हे त्या कुटुंबातील पती-पत्नींच्या नावे असणे आवश्‍यक आहे. तरच सबसिडी मिळेल, अशी माहिती गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाच्या (हुडको) उपमहाव्यवस्थापिका वैजयंती महाबळे यांनी येथे दिली. 

क्रेडाई संस्थेच्या येथील शाखेतर्फे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात माहितीपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर अध्यक्षस्थानी होते. क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, राजीव पारीख, विलास रेवाले, सुभाषराव जोशी, राजेंद्र यादव, अविनाश शाह, धनंजय कदम, मंगेश हिरवे, प्रकाश पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.

महाबळे म्हणाल्या,‘ ज्या कुटुंबातील व्यक्तीचे उत्पन्न तीन ते सहा लाखांच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी प्रामुख्याने या योजनेचा लाभ मिळू शकतो. राज्यातील २५६ शहरांत ही योजना बॅंकांच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यामध्ये कऱ्हाडचा समावेश आहे. मागणीनुसार अन्य शहरांतही त्याचा विस्तार केला जाईल. देशात कोठेही संबंधित लाभार्थ्याच्या नावावर घर असू नये आणि त्याचे आधारकार्ड असणे आवश्‍यक आहे, ही महत्त्वाची अट या योजनेसाठी आहे. त्याचबरोबर संबंधित घर हे त्या कुटुंबातील पती-पत्नींच्या नावे असणे आवश्‍यक आहे, तरच सबसिडी मिळणार आहे. २०१५ पर्यंत ज्यांनी घर कर्ज घेतले आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. यात घर घेणे, बांधणे आणि घराचा विस्तार करण्यासाठी त्याचा लाभ घेता येईल. सहा लाखांच्या कर्जावर १५ वर्षांच्या मुदतीसाठी दोन लाख २० हजार रुपये सबसिडी मिळू शकते. सहा लाखांवरील उर्वरित रकमेवर बॅंकेच्या गृहकर्जाच्या दराने व्याज भरावे लागेल. सबसिडी बॅंकेत जमा केली जाईल. बॅंकेमध्ये पहिल्या सहा लाखांसाठी प्रोसेसिंग शुल्क आकारण्यात येणार नाही. शासन त्यांना ती देईल. उर्वरित रकमेवर बॅंक संबंधित शुल्क आकारू शकते.’ शेखर चरेगावकर, सुभाषराव जोशी यांनी मार्गदर्शन केले.