एकत्रित प्रयत्नांतूनच साखर उद्योग टिकेल - गजानन बाबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

भुईंज - साखर उद्योग टिकला तरच सर्वांचे भवितव्य आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामात नवनव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या उद्योगाशी संबंधित सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न केला तरच हा उद्योग टिकेल, असा विश्‍वास किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, कारखान्याने या गळीत हंगामात सात लाख चार हजार ३२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ११.८७ टक्के साखर उताऱ्याने आठ लाख ३४ हजार २० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गळीत हंगामाची सांगता कारखान्याच्या संचालिका विजया साबळे व जयवंत साबळे, बैलगाडी कंत्राटदार शहादेव सानप व तुळसाबाई सानप, वाहतूक कंत्राटदार राजेंद्र जाधव व संगीता जाधव, संदीप कदम व धनश्री कदम आणि इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी राजकुमार नवले व शुभांगी नवले यांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. संचालक नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र निकम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विजय चव्हाण यांनी आभार मानले. या हंगामात जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, बैलगाडीवान, ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टर वाहतूक कंत्राटदार, केन हार्वेस्टर मशिन मालक, ऊस पुरवठादार गटप्रमुखांचे सत्कार झाले.

Web Title: sugar business gajanan babar