रेशनवरीवरील साखर महागली!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

वाहतुकीसह दुकानदार कमिशन वाढीचा परिणाम; दीड रुपया वाढ

सातारा - वाहतूक दरातील वाढीसह दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ होणार असल्याने शासनाने शिधापत्रिकेवरील (रेशन) साखरेच्या दरातही दीड रुपया प्रति किलोप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३.५० पैसे किलोप्रमाणे असलेली शिधापत्रिकेवरील साखरेसाठी आता १५ रुपये द्यावे लागणार आहेत.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमधील वाढ आणि वाहतुकीचे दर वाढवून देण्याची वाहतूकदार संघटनांनी केलेल्या मागणीमुळे शासनाने ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिधापत्रिकेवर १३.५० रुपये प्रति किलो दराने साखर मिळते. दीड रुपया प्रति किलो दरवाढीमुळे १५ रुपये दराने आता साखर विकत घ्यावी लागणार आहे.

राज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या संघटनांकडून साखरेच्या वितरणाकरिता कमिशन वाढवून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे करण्यात येत होती. साखरेची वाहतूकदेखील नियमित व्हावी, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वाहतुकीचे दर मागील वर्षी वाढवून देण्यात आले आहेत.

राज्यावर आर्थिक बोजा पडत असेल, तर साखरेचे दर वाढविण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य शासनाला दिली आहे. शहरी भागात १५ हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या (अंत्योदय) आणि १५ ते ६९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रति युनिट (माणशी) ५०० ग्रॅम साखर उपलब्ध करून दिली जाते. ग्रामीण भागात १५ ते ४५ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाही प्रति युनिट तेवढीच साखर दरमहा उपलब्ध करून दिली जाते. सणासुदीच्या काळात त्यामध्ये १५० ग्रॅमने वाढ करण्यात येते.

Web Title: sugar rate increase in ration shop