राज्यातील ऊसक्षेत्र २३ टक्‍क्‍यांनी घटले

राज्यातील ऊसक्षेत्र २३ टक्‍क्‍यांनी घटले

कुडित्रे - भारतीय कारखानदार संघटनेने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे यंदाच्या हंगामाचा दुसरा अंदाज जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रात २३ तर कर्नाटकात उसाच्या क्षेत्रात १९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रात ६२.७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या महिन्यात काही कारखाने हंगाम सुरू करतील, असे चित्र आहे. महाराष्ट्रात गतहंगामात १७७ कारखान्यांनी ७४४ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ८४.१८ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

गतहंगामात पावसाने ओढ दिल्याने यंदा ३५ ते ४० कारखान्यांचे हंगाम बंद राहण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, देशभरात गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात पाच टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. देशभरात ४९.९९ लाख हेक्‍टर उसाची लागवड झाली असून २३३.७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

कोल्हापूर विभागात गतहंगामात ३६ कारखान्यांनी हंगाम घेऊन २.८० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा उसाच्या क्षेत्रात सुमारे १५ ते २० हजार हेक्‍टरने घट झाली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांतून दुष्काळामुळे व चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात तोड झाली. याचा चालू हंगामावर परिणाम होणार आहे. कर्नाटकात उसाच्या क्षेत्रात १९ टक्‍क्‍यांनी घट झाली. गेल्या वर्षी ५.१० लाख हेक्‍टर ऊस होता. यंदा ४.१५ लाख हेक्‍टर उस क्षेत्र आहे. २० टक्‍क्‍यांनी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा कर्नाटकातील कारखाने परराज्यातून ऊस आणतील असे चित्र आहे. याउलट उत्तर प्रदेशात ६८.८० लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन वाढून ७६.६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. 

पुणे विभागात २ लाख ४ हजार हेक्‍टर, अहमदनगर ७७, औरंगाबाद ५९, नांदेड ६७, अमरावती, नागपूर १० हजार हेक्‍टरची नोंद आहे. साखर साठ्यावरील निर्बंधांमुळे देशांतर्गत साखरेची विक्री वाढेल, असे चित्र असले तरी अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्री केली नाही. यंदाही ऊस दरावरून संघर्ष होणार असे दिसतेय. २५ ऑक्‍टोबरला जयसिंगपूरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिषद होणार आहे. यंदा उत्पादन खर्च वाढलेने उसदरातही वाढ व्हावी अशी मागणी होत आहे.

साखर उत्पादन अंदाज लाख टन
सन        २०१७    २०१६
कर्नाटक     ३१.९     ४०.७
उत्तर प्रदेश     ७६.६०    ६८.८०
तमिळनाडू     १५.६     १३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com