महावितरणकडून कारखानदारांची कोंडी

प्रमोद बोडके 
सोमवार, 11 जून 2018

सोलापूर - नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम दिली नाही म्हणून राज्य सरकार कारखानदारांच्या बाबतीत कठोर भूमिका घेत आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली वीज महावितरणने खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या विजेची देयके फेब्रुवारी-मार्चपासून प्रलंबित आहेत.

महावितरणने थकविलेल्या बिलांमुळे राज्यातील साखर कारखानदारांची पर्यायाने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.  राज्यातील कारखानदारांची ही रक्कम एक हजार ते बाराशे कोटी रुपयांच्या घरात आहे. महावितरणसोबत साखर कारखान्यांनी वीज विक्रीबाबत केलेल्या करारात महावितरणला ४५ दिवसांचे क्रेडिट देण्यात आले होते. केंद्राने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साडेआठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

Web Title: Sugarfactory electricity