‘स्वरमिलाप’ने मराठी नववर्षाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सांगली - गुढी पाडव्याला मराठी नववर्षारंभ होते. चैत्रपालवीची चाहूलही लागलेलीच असते अन्‌ त्याच वेळी उत्सुकता असते... हा सुवर्णयोग साधून सकाळ माध्यम समूहाने ‘स्वरमिलाप’ या सुरेल मैफलीचे आयोजन केले.

सांगली - गुढी पाडव्याला मराठी नववर्षारंभ होते. चैत्रपालवीची चाहूलही लागलेलीच असते अन्‌ त्याच वेळी उत्सुकता असते... हा सुवर्णयोग साधून सकाळ माध्यम समूहाने ‘स्वरमिलाप’ या सुरेल मैफलीचे आयोजन केले.

सोमवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात वाजता भावे नाट्य मंदिरात, तर मंगळवारी (ता. २८) सकाळी सात वाजता मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात ही मैफल रंगेल. प्रसिद्ध गायक रसिका गानू, शास्त्रीय गायक अभिषेक तेलंग ही मैफल सजवणार आहे, तर सांगली-मिरजेतील श्रोत्यांसाठी ही पर्वणीच ठरेल. प्रवेशही मोफत आहे, तर यंदाचं मराठी वर्ष सुरेल करण्यासाठी नक्की या...!  हॉटेल रणवीर एक्‍झिक्‍युटिव्ह प्रस्तुत असणाऱ्या मैफलीचे ‘माय हुंडाई’, ‘प्रणव बिल्डकॉन’, ‘सांगली गॅस एजन्सी’, ‘ट्राय कलर होंडा’, ‘विजेता डेव्हलपर्स’ व ‘आकाश इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ हे सहप्रायोजक आहे.

मैफलीत शास्त्रीय गायनासह भाव-भक्तिगीतांचे स्वरतरंग श्रोत्यांना अनुभवण्यास मिळतील. मराठी नववर्षाला सर्वांमध्ये सुरेल आनंद भरणारा हा कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी विनामूल्य असेल. तरुण गायिका रसिका गानू या शास्त्रीय संगीत विशारद आहेत. मराठी चित्रपटांतही पर्श्‍वगायन त्यांनी केले आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या गायिका सांगलीत गाणार आहे तसेच शास्त्रीय गायक अभिषेक तेलंग हे ऑल इंडिया रेडिओ गायन स्पर्धेतील विजेते आहेत. अनेक रियॅलिटी शो आणि प्रतिष्ठेच्या व्यासपीठांवर त्यांच्या गायनाची मोहर उमटवली आहे. या दोघा दिग्गज गायकांना ऐकणे म्हणून सांगली-मिरजकरांसाठी पर्वणीच ठरेल. एकूणच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अभिजात भारतीय संगीताची अनुभूती त्यांच्या मैफलीतून मिळणार आहे आणि उत्साहित मनांनीच सांगली-मिरजकर नववर्षाचे स्वागत करणार आहेत. चला, एका अविस्मरणीय मैफलीचे साक्षीदार व्हायला. 

‘मुंबई सोशल’ची तरुणाईमध्ये क्रेझ
‘कमी शुल्क... सर्वोत्तम सेवा’ असं ब्रीद घेऊन कर्नाळ रस्त्यावर हॉटेल रणवीर एक्‍झिक्‍यूटिव्हचा लवकरच प्रारंभ होत आहे. अल्पावधीत ते खव्वयांच्या पसंतीला उतरले आहे. पुण्या-मुंबईनंतर प्रथमच सांगलीत म्युझिक रूमची वेगळी संकल्पना येथे साकारली आहे. ‘मुंबई सोशल’ नावाने ही संकल्पना साकारण्यात आली आहे. त्याची उत्सुकता मात्र शिगेला पोचली आहे. नेमकं इथं असणार काय? मुंबईतलं काय काय पाहायला मिळणार, असे विविध प्रश्‍न साऱ्यांच्यात आहेत. लवकरच सांगलीच्या सेवेला ते हजर होणार आहे; मग अशा ठिकाणी भेट द्यायलाच हवीच ना..!. ‘थ्री स्टार’च्या सुविधा सामान्य दरात देतानाच किंगसाईज व स्वीट लॉजिंग रूम्सची सोय उपलब्ध करून देणारे हे सांगलीतील एक्‍झिक्‍यूटिव्ह हॉटेल ठरले आहे. 
 

सोमवार (ता. २७)
स्थळ - भावे नाट्य मंदिर, सांगली 
वेळ - सायंकाळी साडेसात वाजता 

मंगळवार (ता. २८)
स्थळ - बालगंधर्व नाट्यगृह, मिरज 
वेळ - सकाळी सात वाजता - दोन्ही कार्यक्रमांत प्रवेश विनामूल्य असेल.

Web Title: swarmilap event