कार्ड स्वाइप करा अन्‌ पान खा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

सांगली - तुमचा पान खायचा मूढ आहे; पण खिशात चलनी नोटा नाहीत, तर चिंता करू नका, एटीएम कार्ड घ्या आणि पानपट्टीवर या. पान खा, कार्ड स्वाइप करून बिल भागवा आणि एन्जॉय करा. कॉलेज कॉर्नर चौकातील एका पान शॉपमध्ये स्वाइप मशिन बसवले आहे. विशेष म्हणजे स्वाइप मशिनद्वारे व्यवहार करणारी राज्यातील ही पहिली पानपट्टी असल्याचा दावा संचालक तथा पान महासंघाचे पदाधिकारी विजय पाटील यांनी केला आहे. मशिनमुळे येणेबाकी जमा होत असून, व्यवहार संपूर्ण कॅशलेस असल्याने आम्ही सुरक्षित आहोत. व्यापाऱ्यांसाठी ही यंत्रणा फायदेशीर आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.