तनिष्का निवडणूक: मतदानासाठी सोलापूरात उत्साह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

सोलापूर - सकाळ स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आज (शनिवार) तनिष्का निवडणूकीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महिलांनी मतदान प्रकिया सुरू आहे. तनिष्का सदस्या आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

सोलापूर शहरात आणि जिल्ह्यातील ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील सहा ठिकाणी आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. तनिष्कामधील नेतृत्व गुण विकसित करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही निवडणूक घेण्यात येत आहे. आज सोलापूर शहरातील जूळे सोलापूरातील समर्थ नगरातील सभागृहात मतदान पार पडले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, करमाळा आणि बोरामणी या ठिकाणी देखील मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक महिलांनी मोबाईलवरून मिस्ड कॉल देऊन आपले मतं दिले आहे. तसेच अनेक महिलांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर सुशिला आबूटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि सकाळच्या या उपक्रमाचे कौतूक केले.