तीन क्रीडासंकुलांचा निधी गेला दुसरीकडे

सचिन शिंदे
शनिवार, 8 एप्रिल 2017

कऱ्हाड - जिल्ह्यातील तीन तालुका क्रीडा संकुलांचा निधी न वापरल्याने राज्यातील अन्य तालुका क्रीडा संकुलांच्या कामांसाठी वर्ग करण्यात आला आहे. राज्य क्रीडा समितीनेही त्याला मान्यता दिली आहे. शासनानेही हा निधी वर्ग केला आहे. त्यात कोरेगाव, खंडाळा व वाई तालुक्‍यांचा सुमारे ७७ लाख ६४ हजारांचा निधी वर्ग झाला आहे. 

कऱ्हाड - जिल्ह्यातील तीन तालुका क्रीडा संकुलांचा निधी न वापरल्याने राज्यातील अन्य तालुका क्रीडा संकुलांच्या कामांसाठी वर्ग करण्यात आला आहे. राज्य क्रीडा समितीनेही त्याला मान्यता दिली आहे. शासनानेही हा निधी वर्ग केला आहे. त्यात कोरेगाव, खंडाळा व वाई तालुक्‍यांचा सुमारे ७७ लाख ६४ हजारांचा निधी वर्ग झाला आहे. 

तालुका पातळीवरील खेळाडूंच्या विकासासाठी खेळांच्या किमान सुविधा देण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात क्रीडा संकुल उभारण्याची संकल्पना २००१ मध्ये शासनाने जाहीर केली. २६ मार्च २००३ रोजी प्रत्यक्ष कामही सुरू करताना प्रत्येक संकुलासाठी २५ लाखांच्या निधीची तरतूद केली. २१ मार्च २००९ रोजी त्या निधीची मर्यादा एक कोटीपर्यंत वाढवून दिली. तरीही राज्यातील १०९ तालुका क्रीडा संकुलांपैकी २६ तालुका क्रीडा संकुलांचा निधी वापराविना राहिला. एकूण नऊ कोटी २७ लाख ६४ हजारांचा निधी पडून असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यात जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. त्यांचा सुमारे ७७ लाख ६४ हजारांची निधी अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले. शासनाने तालुका क्रीडा संकुलांकडे 

पडून असलेल्या निधीचे लेखापरीक्षण करून काही आक्षेपही नोंदवले. अंतिम टप्प्यात काम असलेल्या क्रीडा संकुलांना हा निधी वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. 

राज्य क्रीडा समितीनेही त्यास मान्यता दिली. त्यानुसार कोरेगाव, वाई व खंडाळा येथील तीन तालुका क्रीडा संकुलांचा निधी अन्य तालुका क्रीडा संकुलांना वर्ग झाला आहे. कोरेगावचा ५७ लाख ६४ हजार, तर खंडळा व वाई तालुका क्रीडा संकुलाचा प्रत्येक दहा लाखांचा निधी वर्ग झाला आहे. 

सव्वीस तालुक्‍यांचा समावेश
साताऱ्यासह कोल्हापूर, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, रायगड, बीड, नगर जिल्ह्यातील प्रत्येक दोन, तर पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, औरंगाबाद व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुका क्रीडा संकुलांचाही अखर्चिक निधी शासनाने अन्य जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाच्या कामाकडे वर्ग केला आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरचा ९० लाख व चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व जिवती अशा दोन्ही तालुक्‍यांचा प्रत्येकी एक कोटींचा निधी वर्ग झाला आहे. मुरुड जंजिऱ्याचा ७५ लाख, धडगाव (जि. नंदुरबार) क्रीडा संकुलाचा ५० लाखांचा निधी वर्ग झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक दोन कोटींचा निधी वर्ग झाला आहे. त्यात पारशिवणी व शिवापूरच्या क्रीडा संकुलासांठी प्रत्येकी एक कोटीचा निधीचा समावेश आहे. त्याशिवाय कर्जत-९० लाख, ठाणे, वाडा प्रत्येकी ७५ लाख, शिरूर- ८० लाख, औसा- ६० लाख, बावणी- ६५ लाख, कवठे महांकाळ- ६० लाख, मंडणगड- ७५ लाख, जिंतूर- ७७.६४ लाखांचा निधी वर्ग झाला आहे. 

राज्यातून सव्वानऊ कोटींचा निधी वर्ग 
राज्यातील २६ क्रीडा संकुलांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. तो निधी १२ क्रीडा संकुलांकडे वर्ग झाला आहे. ज्यांची कामे अंतिम टप्प्यावर आहेत. अशांना तो निधी देण्यात आला आहे. २६ तालुका क्रीडा संकुलांचा निधी नऊ कोटी २७ लाख ६४ हजार आहे. तो आठ जिल्ह्यांतील १२ तालुका क्रीडा संकुलांकडे गेला आहेत. त्यात रायगड, ठाणे, सांगली, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, लातूर व नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 

वर्ग झालेल्या निधीची रक्कम
 कोरेगाव- ५७ लाख ६४ हजार 
 खंडाळा- दहा लाख रुपये
 वाई- दहा लाख रुपये 

Web Title: Three sports packages Fund