गुजरीत 10 ग्रॅम सोने 32 हजारालाच... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

अडचणीत कोणीही येणार नाही 
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा बाहेर काढत असताना लाखाला पन्नास हजार रुपये देऊन कोणी सराफ या मोहिमेच्या विरोधात काम करतील, असे वाटत नसल्याचे सराफ व्यावसायिक राजू सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, ""असा एकही व्यवहार झालेला नाही. ज्याला माहिती आहे, त्यांनी मला सांगावे. मी तक्रार देण्यास तयार आहे. केवळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण कोणताही सच्चा सराफ असला विचित्र व्यवहार करून स्वतः अडचणीत येणार नाही.''

कोल्हापूर - सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32 हजार रुपयेच असल्याचे व सोन्याच्या दरात वाढ, ही केवळ अफवा असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजेश राठोड यांनी आज "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, ""सोन्याची टंचाई, नोटा रद्दचा निर्णय, अमेरिका राष्ट्रध्यक्ष निवडणूक याचा कोणताही परिणाम सराफ बाजारावर नाही. उलट सोने 32 हजार रुपये दर असतानाही त्याला फारसे गिऱ्हाईक नाही. पाचशेच्या नोटा असलेले एक लाख रुपये गुजरीत घेऊन यायचे व त्या बदल्यात शंभरच्या नोटा असलेले 70 हजार रुपये घेऊन जायचे असला एकही व्यवहार गुजरीत झालेला नाही.'' 

ते म्हणाले,""आता कागदाचीच किंमत असलेल्या 500 रुपयांच्या नोटा घेऊन त्या बदल्यात कोणी सराफ आपल्याकडील किंमतमूल्य असलेल्या 100 रुपयांच्या नोटा दुसऱ्याला देत असेल तर तो केवळ मूर्खपणा असेल आणि कोणताही सराफ असला आतबट्ट्याचा व्यवहार करणार नाही. असे कोणी करत असेल तो देशद्रोहच असेल. पण आपल्याकडचा अधिकृत पैसा देऊन अनधिकृत पैसा घ्यायचा प्रकार कोणत्याही शहाण्या सराफाकडून होणार नाही. असा कोणताही प्रकार होत नसताना गुजरी बदनाम केली जात आहे.'' 

ते म्हणाले, ""ज्या दिवशी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या त्या क्षणापासून काही तासांत जरूर काही लोकांनी चढ्या दरातही सोने खरेदीसाठी प्रयत्न केला असेलही, पण अशा व्यवहारात सराफ अडकलेले नाहीत. आज सराफ बाजारात सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 32 हजार रुपये आहे. सोनेही मुबलक आहे. नवीन नोटा किंवा शंभरच्या नोटा अथवा चेक दिल्यास पावतीसह सोने विक्री सुरू आहे आणि मध्यमवर्गीयांनी तर अशा खरेदीची भीती बाळगण्याचे कारणच नाही. मुद्दाम काही घटक गुजरीबद्दल गैरसमज पसरवत आहेत.'' 

पश्चिम महाराष्ट्र

सांगली - मनःशांती व कुटुंबीयांना स्पेस म्हणून सर्वच घटकांना पर्यटनासाठी बाहेर जावे वाटते. दिवाळीची सुटी असो किंवा नाताळ....

03.18 AM

सांगली - येत्या 31 ऑगस्टला स्थायी समितीतील सत्ताधारी कॉंग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांची दोन वर्षांची...

02.33 AM

सांगली - उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे... घरोघरी येणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी सारे जण...

02.33 AM