गर्दीचा विचार करून वाहतूक मार्गात बदल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील चैत्र यात्रा 8 ते 10 एप्रिलदरम्यान होत आहे. देशभरातील लाखो भाविकांच्या यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. एकेरी मार्गासह पार्किंगची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुने आंब्याचे झाड (दोनेवाडी क्रॉसिंग), जुने एसटी स्टॅंड, मुख्य पार्किंग, यमाई पार्किंग ते गिरोली फाटादरम्यान मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

एकेरी व प्रवेश बंद केलेले मार्ग  
केर्ली व कुशिरे फाटा मार्गे सर्व वाहने जोतिबा डोंगरावर सोडण्यात येणार आहेत; मात्र इतर वाहनांना हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. 
केर्ली-कुशिरे गावावरून येणारी सर्व वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे डोंगरावर सोडण्यात येतील. 
एसटी बससह अत्यावश्‍यक सेवेतील मोटार वाहने सामाजिक वनीकरण येथून दोनेवाडी क्रॉसिंग मार्गे सोडण्यात येणार आहेत. 
घाट उतरताना डोंगरावरील सर्व वाहने दोनेवाडी फाट्यावरून वाघबीळ अगर गिरोली मार्गे पुढे मार्गस्थ होतील. 
वाघबीळ व शाहूवाडीकडून दाणेवाडी मार्गे येणारी सर्व वाहने केर्ली मार्गे सोडण्यात येतील. माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग फक्त मार्गस्थ होण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. अवजड वाहने, रिक्षा, ट्रॅक्‍टर ट्रेलर यांना डोंगरावर जाण्यास 8 एप्रिलपासूनच प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

मोटार वाहन पार्किंग 
यमाई मंदिर दोन्ही बाजूस (चारचाकी), मेन पार्किंग (लक्‍झरी, मिनी बस), ग्रामपंचायत पार्किंग (चारचाकी), नवीन एसटी स्टॅंडसमोरील परिसर (चारचाकी), यात्री निवाससमोर (राखीव), यात्री निवास आतील परिसर (मोटारसायकल), तळ्याच्या सभोवतालचा परिसर (चारचाकी), नवीन एसटी स्टॅंडसमोरील व मागील बाजूचे पठार (चारचाकी), दानेवाडी क्रॉसिंग (मोटारसायकल), शवताई मंदिर परिसर (चारचाकी), गिरोली फाटा ते दानेवाडी रोड परिसर (मोटारसायकल मोटार). 

Web Title: Traffic in the way of change