दहा लाखांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नगर - वाळू ठेकेदाराला दहा लाखांची मागणी करणाऱ्या तिघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गजानन राशीनकर (रा. निर्मलनगर), बापू श्रीधर बाचकर आणि संतोष ब्राह्मणे (रा. कोपरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

वाळू ठेकेदार नंदकुमार कचरू गागरे (रा. सावेडी) यांनी याबाबत फिर्याद दिली. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये राशीनकर मनसेचे शहराध्यक्ष असून, बाचकर पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत.

Web Title: Tribute crime

टॅग्स