वरातीत नाचणाऱ्या दोन युवतींचा पाठलाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

शाहूवाडी - हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील एका लग्नाच्या वरातीमध्ये नाचगाण्यासाठी आलेल्या कोल्हापुरातील दोन युवतींचा बांबवडेपर्यंत पाठलाग करून पहाटे त्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हारुगडेवाडी येथील १२ जणांना आज शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित युवती बांबवडे येथील एका दवाखान्यात घुसल्या. तेथील परिचारिकेने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांत शाहूवाडी पोलिस घटनास्थळी धावल्याने अनर्थ टळला.

हारूगडेवाडी येथे एकाच्या लग्नाच्या वरातीसाठी नाचगाण्यासाठी कोल्हापूर येथील दोन युवतींना आणले होते. वरातीत नाचगाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री उशिरा त्या युवतीसोबत आलेल्या एकाबरोबर मोपेडवरून कोल्हापूरकडे निघाले होते. त्या वेळी हारूगडेवाडी येथील संकेत पाटील, प्रीतम दिंडे, दीपक पाटील, सम्राट, विशाल, बोक्‍या व अन्य अल्पवयीन तिघे त्यांचा पाठलाग करत बांबवडे येथे पोचले. बांबवडे येथील चौकात युवतींना अडवण्याचा प्रयत्न झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन युवती एका दवाखान्यात घुसल्या. तेथील परिचारिकेनेही थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यामुळे शाहूवाडी पोलिस अवघ्या पंधरा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी दवाखान्याच्या दरवाजावर लाथा मारून दंगा घालणारे युवक पळू लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परिचारिका आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल पाटील अधिक तपास करत आहेत.