निम्म्या शहराचा पाणीपुरवठा उद्यापासून दोन दिवस बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कोल्हापूर - शिंगणापूर योजनेच्या पाईपच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. 15) व मंगळवारी (ता. 16) निम्म्यापेक्षा अधिक शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

काळम्मावाडी योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली 800 मिलिमीटर व्यासाची एम. एस. पाइप शिंगणापूर योजनेतील एक मीटर व्यासाच्या वाहिनीला जोडण्याचे काम सोमवार (ता.15) पासून शेंडापार्क येथील चौकात हाती घेण्यात येणार आहेत. दोन दिवस काम चालणार आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरातील ए, बी, व ई वॉर्ड आणि त्याला सलंग्न असलेल्या उपनगरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार (ता.17) पासून या सर्व भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. महापालिकेने या काळात पर्यायी म्हणून टॅंकरची व्यवस्था केली आहे.