मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

राजकुमार शहा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) घडली आहे.

पहिली घटना सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी शिवारात आज (सोमवार) सकाळी सव्वाआठ वाजण्यापुर्वी घडली. संजय तुळजीराम मल्लाव (वय 38, रा. कोळेगाव) याचा एका हॉटेल शेजारील पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यु झाल्याची माहिती महादेव तुळजीराम मल्लाव (रा. कोळेगाव) याने मोहोळ पोलिसांत दिली आहे. या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. मात्र, संजयचा खुन झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दुसरी घटना सावळेश्वर येथे घडली. बिरा केराप्पा गावडे (वय 70) या वृद्धाने आजार पणाला कंटाळून घराशेजारील चिंचेच्या झाडाला आज सकाळी सव्वाआठ वाजता गळफास घेतला. या घटनेची माहिती सिकंदर सुखदेव गावडे (वय 52) याने मोहोळ पोलिसांत दिली आहे. दोन्ही घटनेचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

Web Title: two people died different incidents in mohol taluka