चांदोली धरण ९९ टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

वारणावती - चांदोली परिसर व पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने चांदोली धरणाची पाणी पातळी ९९ टक्के झाली, तर धरणात पाण्याची आवक जास्त असल्याने  वीजनिर्मिती  सुरू झाली. ७६१ क्‍युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात केला आहे. चांदोली धरण क्षेत्रात  पावसाने उघडीप दिल्याने १७ रोजी बंद केला होता. वीजनिर्मिती शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू झाली. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. धरण पूर्ण भरत आल्याने नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले.

सध्या पावसाचा जोर मंदावला. गेल्या २४ तासांत केवळ ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४५० क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे  धरणातील पाणीसाठा वाढतच आहे. धरणात सध्या ३४.१२ टीएमसी पाणीसाठा झाला. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे वीजनिर्मितीसाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली. आज येथील वीजनिर्मिती केंद्रातील एक जनित्र सुरू करून ८ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली. २४ तासात ३ मिलिमीटर पावसासह एकूण १७८४ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली.