बेळगाव : भिक्षुकांसाठी पार्टीचे आयोजन करणारा अवलिया विजय पाटील

दर दोन महिन्यातून भिक्षुकांसाठी पार्टीचे आयोजन
Vijay Patil organizing  party for beggars
Vijay Patil organizing party for beggarssakal

बेळगाव : वाढदिवस असो किंवा एखादा आनंदाचा छंद अनेक जण एकमेकांना पार्टी देऊन आंनद द्विगुणित करीत असतात मात्र शहरातील एक अवलिया भिक्षुकांसाठी दोन महिन्यातून एकदा पार्टीचे आयोजन करीत आहे. त्यामुळे भिक्षूकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीचे कौतुक करावे तितके कमीच असून एकावेळी 80 हुन अधिक भिक्षुक एकत्र येत या पार्टीचा आनंद लुटीत आहेत.

लग्न समारंभ, बारसे, वाढदिवस किंवा इतर सण उत्सव यांच्या निमित्ताने अनेक जण एकत्र येऊन पार्टी करतात. तसेच गेल्या काही दिवसांपासून तर पार्टी करणे म्हणजे एक फॅशनच बनली आहे. मात्र शहरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून भिक्षुक आणि निराधार लोकांसाठी पार्टीचे आयोजन करण्याचा संकल्प करीत, गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमास सुरुवात केली आहे.

सुरुवातीला काही वर्षे वर्षातून एकदा किंवा दोनदा भिक्षुक व निराधारांना एकत्र करून पार्टी दिली जात होती. मात्र या पार्टीच्या माध्यमातून भिक्षूकाना मिळणारा आनंद पाहून पाटील यांनी दर दोन महिन्यातून एकदा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले व त्यानुसार पार्टीचे आयोजन केले जात असून कॅम्प येथील असद खान दर्ग्याच्या परिसरात भिक्षुकाना एकत्र केले जाते. व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी नॉनव्हेज जेवण उपलब्ध करून दिले जाते.

ज्या दिवशी पार्टी असते त्या दिवशी विजय पाटील यांचे सहकारी भिक्षुकाना व निराधारांना पार्टीची माहिती देतात त्यानंतर भिक्षुक एकत्र येऊन जेवणाचा आनंद लुटण्या बरोबरच आपलीच सुखदुःखे ही एकमेकांना सांगून आधार देण्याचा प्रयत्न करतात.यावेळी पाटील व त्यांचे सहकारी पार्टीत कोणत्याही प्रकारची कमी राहू नये याची जातीने दखल घेऊन त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे याबाबतची माहिती घेऊन मदत करतात.

पाटील यांनी कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. तसेच अनेक महिने जेवण उपलब्ध करून दिले होते. त्यामुळेही त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. अनेक जण पार्टीचे आयोजन करून हजारो रुपये खर्च करतात पण पाटील यांनी भिक्षुक लोकांच्या चेहऱ्यावर काही वेळ का असेना आनंद फुलविण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे

अनेक ठिकाणी भिक्षुक बसलेले दिसून येतात त्यांना पैसे दिल्यानंतर ते चांगल्या प्रकारचे जेवण करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्टीच्या निमित्ताने त्यांना चांगले जेवण उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे भिक्षूकानाही काहीसा विरंगुळा मिळत आहे.

- विजय पाटील, उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com