खानापुरात पाणीसाठे संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

२३ गावे, ३५ वाड्यांवर अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा    

विटा - खानापूर घाटमाथा व दुष्काळी पट्ट्यातील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची परवड सुरू आहे. जून महिना उजाडला तरी अजूनही २३ गावे, ३५ वाड्यांवरील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पुरवठा सुरू आहे. पाण्याविना शेतीही कोरडी ठणठणीत पडली आहे. वळीव पावसानेही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या खानापूर तालुक्‍याला सतत अस्मानी संकटे व पाणीटंचाईने ग्रासले आहे. दोन-तीन वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला आहे. वर्षभरापासून तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. वर्षभर मागेल त्या गावांत प्रशासनाने टॅंकर सुरू केलेत. मोठे पाणीसाठे होण्याइतपत अजूनही मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे यावर्षी तलाव, ओढे, नाले, विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. त्याचा परिणाम शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यावर झाला. पावसाचे पडणारे पाणी साठविण्यासाठी प्रशासनाने व लोकसहभागातून चार वर्षांत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. मात्र, पावसाची हुलकावणी नित्याचीच झाली आहे. 

सध्या तालुक्‍यातील ४१ हजार ६९६ लोकांना २१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खानापूर व आटपाडी तालुक्‍यातून उपलब्ध असणाऱ्या ठिकाणाहून हे पाणी टंचाईग्रस्त गावांत पुरविले जात आहे. वर्ष झाले टॅंकरचे पाणी लोक पित आहेत. वर्षभर पाण्याविना हाल होणारी जनता पावसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहात आहे.