नगर - पाणीदार नांदुर पठारासाठी परिसरातील गावे सरसावली

सनी सोनावळे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुक्यातील वाॅटर कप स्पर्धा चांगलीच रंगत आली आहे. नांदुर पठारासाठी तर परिसरातील गावांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीसह श्रमदान करण्यासाठी गावामध्ये येत आहेत.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुक्यातील वाॅटर कप स्पर्धा चांगलीच रंगत आली आहे. नांदुर पठारासाठी तर परिसरातील गावांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीसह श्रमदान करण्यासाठी गावामध्ये येत आहेत.

आज (ता.19) पिंपळगाव रोठा येथील अशोक घुले मित्र मंडळाने या स्पर्धेसाठी पंचवीस हजार रूपये देणगी दिली. त्याचा धनादेश सरपंच अशोक घुले यांच्या मार्फत गावातील समितीकडे सुपूर्द करण्यात आला.
या मंडळातील तरूणांनी एक दिवस जलसंधारणाच्या कामांमध्ये श्रमदानही केले. अत्यंत दुर्गम व डोगंराच्या कुशीत वसलेल्या गावात ग्रामस्थ, तरुण, महिला, जेष्ठ नागरिकांनी आपले संपूर्ण गावच पाणीदार करुन गावाचा कायापलट करण्याचा जणु संकल्पच केला आहे.

 गेल्या तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर याची तयारी सुरू आहे. यात कामानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरात गेलेले जवळपास 400 ते 500 तरूण रात्रंदिवस आपले गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करत आहेत. शहरात राहणारे हे तरुण स्वतःचे घरदार, कामधंदा विसरुन ही ध्येयवेडी माणसे पायाला भिंगरी बांधून निधी संकलन व पाण्याचे महत्व सांगण्यासाठी जनजागृती करत आहेत या तरुणांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए पदवीधर, पोलीस अधिकारी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर असे सर्वच क्षेत्रातील लोक आपला सहभाग नोंदवित आहेत. यांना याचे मार्गदर्शन पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे, तालुका समन्वयक शरद घनवट मयुरी जमदाडे करत आहेत.

राज्यातील 75 तालुक्यातील 5900 पेक्षा जास्त गावांनी प्रत्यक्ष यात आपला सहभाग नोंदविला असुन. 75 लाख रुपयांचे प्रथम बक्षीस ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेत 100 गुणांची परीक्षाही आहे.

संधीचे सोने करा..
आपण आग्रह करून हे जिल्ह्यातील दुष्काळी तालुके निवडले आहेत लोकसहभागातुन हे कामे करायची आहे ही ग्रामस्थांनी संधी आहे तीचे सोने करा ह्याच गावांना पुढे जलयुक्त शिवार योजनेचे कामे करायची आहेत देशाला आदर्श ठरणारे राळेगण सिद्धी व हिवरे बाजार सारखे गावे निर्माण करून आदर्श निर्माण करा तालुक्यातील पुणेवाडी व नांदुर पठार यांनी चांगला पुढाकार घेतला आहे इतरांनीही घ्यावा, असे पोपट पवार यांनी सांगितले. 

Web Title: for water filled nandur pathar villager come together for watercup