आटपाडी तालुक्यातील करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

आटपाडी तालुक्यातील करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

 झरे - झरे (ता आटपाडी) परिसरातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपलेली आहेत. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडला आलेली पिके वाया गेली. पिके जागेवर करपल्याने खरीप वाया गेला आहे.  पुढे रब्बीची पेरणी होतेय का नाही याच चिंतेत शेतकरी आहे. तलाव आटले तर, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. चारा  व पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गुरे-ढोरे जगवायची कशी असा गंभीर प्रश्न आहे. 

नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांना याबाबत निवेदन देण्यात आले.  पावसाभावी करपलेल्या खरीप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामे करावेत व परिसरातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी,  अशी मागणी निवेदनात केली आहे.

सरपंच श्रीमंत तरसे, सरपंच चंद्रकांत पावणे, झरेचे अधिक माने, कुरुंदवाडीचे तातोबा वगरे, सदस्य बिरुदेव खोत, नानासो खोत, पिंपरीचे रामचंद्र डीसले, विजय माने, शिवाजी तरसे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com