मसूरची टाकी कोसळण्याचा धोका

मसूर - धोकादायक पाण्याची टाकी. (दुसऱ्या छायाचित्रात) जमिनी लागूनचा कुमकुमवत झालेला पिलरचा भाग.
मसूर - धोकादायक पाण्याची टाकी. (दुसऱ्या छायाचित्रात) जमिनी लागूनचा कुमकुमवत झालेला पिलरचा भाग.

मसूर - गावास पाणी वितरित करणारी ३८ वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी कुठल्याही क्षणी भुईसपाट होण्याची शक्‍यता वाढू लागलेली आहे. ही टाकी अचानक कोसळल्यास गंभीर दुर्घटनेसह गावात कृत्रिम पाणीटंचाई होणार आहे. पंपहाउसही शेवटची घटका मोजत आहे. 

तीन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी १९८० च्या सुमारास बांधण्यात आली आहे. टाकीची कालमर्यादा संपली आहे. टाकी कालबाह्य झाल्याचा निर्वाळा पाणीपुरवठा विभागाने तपासणीनुसार वर्षापूर्वीच दिला आहे. गावाच्या पश्‍चिम आणि उत्तर बाजूस असलेल्या विहिरीतील पाणी पाइपलाइनद्वारे आणून या टाकीत साठवून ठेवले जाते. या टाकीतून गावात वितरित केले जाते.

सद्य:स्थितीनुसार पाण्याची टाकी धोकादायक असल्यामुळे कुठल्याही क्षणी कोसळू शकते. टाकीचे ठिकठिकाणचे सिमेंटचे ढेपले आपोआप खाली पडत आहेत. लोखंडी सळया जागोजागी उघड्या पडल्या आहेत. वरील बाजूकडून पाणीही झिरपत आहे. आधार असणाऱ्या पिलरना मोठ्या भेगा पडल्याने सळयाही दिसतात.

...अशी आहे स्थिती
टाकी कासळण्याची शक्‍यता असल्याने तेथे जाण्याऱ्या लोकांना मज्जाव करावा
पेयजल योजना होईपर्यंत ही टाकी तग धरणार का?
शुद्धीकरण यंत्रणा सुस्थितीत मात्र, पंपहाउस डबघाईला
कर्मचारी काम करताना भीतीच्या छायेखाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com