सोनाईतर्फे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत

palkhi
palkhi

वालचंदनगर - वरुणराज्याच्या हलक्या सरीमध्ये गोखळी (ता.इंदापूर) जवळील सोनमाथा येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोनाई परिवारच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज सोमवार (ता.१६) रोजी निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूरकडे मार्गस्थ झाला. आज सकाळपासुन इंदापूर तालुक्यामध्ये वरुणराज्याचे आगमन झाले. पावसाच्या हलक्या सरी अंगावरती झेलत वैष्णव पालखी सोहळ्याची वाट चालत होते. ग्यानबा तुकारामाचा जयघोषामध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोनमाथा येथे येताच सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सोनाईचे कार्यकारी संचालक विष्णूकुमार माने, संचालक हरिश्‍चंद्र माने, किशोर माने,अतुल माने यांनी रिमझिम पावसामध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळा प्रमुखांचा दशरथ माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाई च्या वतीने सर्व वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले आहे.२००२ पासुन सोनाईच्या माध्यमातुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात येत आहे. सोनमाथ्यावर विसाव्यानंतर पालखी सोहळा इंदापूरमधील गोल रिंगण सोहळ्यासाठी मार्गस्थ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com