मागूनही मिळेना विहीर...

मागूनही मिळेना विहीर...

सोलापूर : मागेल त्याला शेततळे या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला विहिर योजना राज्यात राबविली जात आहे. परंतु, दरवर्षी साडेचार हजार विहिरींचे उद्दिष्टे देऊनही मागील पाच वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागणी करुनही विहीरी मिळाल्या नाहीत. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हिच स्थिती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

मागेल त्याला विहीर योजनेच्या काटेकोर निकषांमुळे गरज असूनही या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. मागील सहा वर्षात एकट्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे 15 हजार विहिरी पूर्ण होणे अपेक्षित होते. या विहिरींचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत करावे लागणार आहे. त्यासाठी जॉबकार्ड असलेल्या मजूरांचीच गरज आहे. त्यामुळे मजूर शोधणे आणि सहा महिन्यात विहीर पूर्ण करणे कठीण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. 

भूजल पातळी कमी असलेली गावे वगळून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विहीर देणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र, मागील चार-पाच वर्षात शेतकऱ्यांना का विहिरी देण्यात आल्या नाहीत, हे सांगणे कठीण आहे. 
- चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

ठळक बाबी... 
- 2013-14 मध्ये भूजल पातळी घटल्याने योजना ठप्प 
- 2016-17 मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी सरासरी 4900 विहिरींचे टार्गेट 
- पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकाही लाभार्थ्याला विहीर मिळाली नाही 
- 2017-18 साठी 4900 विहिरींचे उद्दिष्टे : प्रस्ताव मागविले 

तालुकानिहाय उद्दिष्टे 
(2018-19) 
तालुका उद्दिष्टे 
अक्‍कलकोट 559 
बार्शी 619 
करमाळा 500 
माढा 514 
माळशिरस 509 
मंगळवेढा 376 
मोहोळ 447 
पंढरपूर 447 
सांगोला 362 
उ.सोलापूर 179 
द.सोलापूर 395 
एकूण 4900

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com