...पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

कोल्हापूर- राज्यातील सहकारी बॅंकांकडे जमा झालेल्या नोटा अद्यापही स्विकारल्या जात नाहीत. त्या बदलून दिल्या जात नाही. मागणी करुनही यावर निर्णय होत नसल्याचे याच्या विरोधात सोमवारी (ता. 30) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे दिली. येथील भीमा उद्योग समुहाच्या वतीने आयोजित भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर- राज्यातील सहकारी बॅंकांकडे जमा झालेल्या नोटा अद्यापही स्विकारल्या जात नाहीत. त्या बदलून दिल्या जात नाही. मागणी करुनही यावर निर्णय होत नसल्याचे याच्या विरोधात सोमवारी (ता. 30) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे दिली. येथील भीमा उद्योग समुहाच्या वतीने आयोजित भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, 'नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका शेती व सहकार विभागाला बसला. नोटबंदीनंतर सहकारी बॅंकांमध्ये 8660 कोटी रुपये जमा झाले. या नोटा स्विकारत नसल्याने आम्ही केंद्रीय स्तरवर प्रयत्न केले. याच्या विरोधात न्यायालयात गेलो. न्यायालयाने सांगून सुद्धा याची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना वकील म्हणून नियुक्त केले. परंतू अद्यापही या नोटा स्विकारुन त्याच्या बदली नव्या नोटा दिल्या जात नाहीत. यामुळे आम्ही पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहोत.'

नोटाबंदीनंतर सर्वात अधिक फटका शेती क्षेत्राला बसला. बाजारभाव घसरल्याने अनेक ठिकाणी शेतमाल रस्त्यावर फेकावा लागला. यामधून मोठे नुकसान झाले. व्यवहार ठप्प झाल्याने अनेक जण बेरोजगार झाले. नोकऱ्या गेल्याने नरेगा सारख्या योजनेत लाखोच्या संख्येने बेरोजगार दाखल झाले. हा खूप मोठा धक्का होता. अजूनही या धक्‍यातून लोक सावरले नाहीत.

सातत्याने उदभवणाऱ्या प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी तंत्रात बदल करणे अनिवार्य झाले. मातीविना शेतीसारखे प्रयोग स्वीकारणे, गायीच्या दुधावर प्रकीया करणारे उद्योग तयार करणे, त्याची पावडर करुन त्याची विक्री करणे असे अनेक उद्योग करणे शक्‍य आहे. या उद्योगाकडे शेतकऱ्यांबरोबर सहकारी संस्थांनीही वळावे तरच शेतकरी सुखी होवू शकेल. कोणत्याही परिस्थितीत शेतीवरील बोजा कमी करणे हे आव्हान आहे. यासाठी सर्वच कुटुंब शेतीवर अवलंबून न ठेवता एखाने नोकरी अथवा अन्य व्यवसाय केल्यास कुटुंबावरील बोजा कमी होवून त्याचा सातबारा कोरा होवू शकेल. श्री पवार यांनी देशभरातील अन्नधान्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी वेगवाग प्रगती करुन इतरांना दिशा द्यावी असे आवाहन श्री पवार यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेव महाडिक, आमदार संध्याताई कुपेकर, श्रीमती निवेदिता माने, माजी खासदार कल्लपाण्णा आवाडे महापौर हसीना फरास आदि उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाचे संयोजक धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले.

कोल्हापुरची मातीच वेगळी...
आम्हा तिघा भावंडाना देशपातळीवरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यात माझ्या आईचा मोठा वाटा आहे. माझी आई मुळची कोल्हापुरचीच. तिचे संस्कारच आम्हाला आमच्या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहीत करतात, असे श्री पवार यांनी यावेळी नमूद केले.